पु.लं.चा विनोद कसा होता?
सगळ्या वयोगटातल्या, सगळ्या थरातल्या लोकांना निखळ आनंद देणारा तर होताच.. त्याचबरोबर चाकोरीतल्या मध्यमवर्गीय समाजाच्या व्यथेवर नेमकेपणाने बोट ठेवणारा होता. सामाजिक व्यवस्था, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, मंत्र्यांचे मतलबी राजकारण याची रसिकांना नकळतपणे जाणीव करुन देणारा होता..
'दारू म्हणजे काय रे भाऊ ?' हे प्रहसन म्हणजे या खास 'पु.ल.' विनोदाचेच उत्तम उदाहरण !