#BolBhidu #PuneCats #Hadpsar300Cats
मांजर हा मुख्यतः बायकांच्या लाडाचा विषय आहे. पाळीव प्राणी या कथाकथानातलं पुलंच हे वाक्य. हे तंतोतंत खरं असल्याचं आपल्याला बऱ्याचदा जाणवतं. स्त्रियांचं मांजरप्रेम हे काही लपून राहत नाही. पण पुण्यातल्या दोन बहिणींच्या मांजरप्रेमानं मात्र कहर केलाय. हडपसर इथल्या एका सोसायटीत राहणाऱ्या दोन बहिणींनी आपल्या घरात एक-दोन नाही तर तब्बल साडे तीनशे मांजरी पाळल्याचं समोर आलंय. पण त्यांच्या या अतिरेकी मांजरप्रेमाचा परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मात्र भीषण त्रास होतोय. गेली पाच सहा वर्ष या मांजरींच्या ओरडण्यामुळं, त्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीला सोसायटीतले लोक वैतागले.
यामुळं रोगराई पसरण्याची भीतीही रहिवाशांनी व्यक्त केलीय अनेकदा सांगून सुद्धा शेकडो तक्रारी करुन सुद्धा यावर या दोन्ही बहिणी कोणतीही अँक्शन घेतली नाही. उलट सोसायटीतील इतर रहिवाशांवरच खोटेनाटे आरोप लावले. त्यांची ही मुजोरी वाढल्यामुळं रहिवाशांनी प्रशासनाकडं धाव घेतली. प्रशासनानही यावर आता कारवाई करुन या दोन्ही बहिणींना मांजरींना तातडीनं बाहेर काढण्याचे आदेश दिलेत. पण हे प्रकरण नक्की आहे काय, हडपसरमधल्या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांची तक्रार काय आणि या बहिणींकडून मांजरी पाळण्यामागचं कारण काय पाहुयात व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/