MENU

Fun & Interesting

Pune, वसंतोत्सव, YouTube Collective आणि Boys Talk With Rahul Deshpande | Aarpaar Marathi

आरपार | Aarpaar 28,396 5 months ago
Video Not Working? Fix It Now

#RahulDeshpande #Aarpaar #आरपार शास्त्रीय संगीतविश्वात आज आघाडीच्या काही तरुण गायकांची नावं काढली, तर एक नाव हमखास घेतलंच जातं, ते म्हणजे सुप्रसिद्ध गायक 'राहुल देशपांडे'. पिढीजात आलेला सांगीतिक वारसा जपणं ही सोप्पी गोष्ट नसते, अनेकदा तुलना-टीका केली जाते, राहुल मात्र याला अपवाद आहे असं म्हणायला हरकत नाही. आजोबांकडून आलेला वारसा जपत, क्वचित झालेल्या टीकांमधून तावून सुलाखून बाहेर पडत स्वतःच्या रियाजाने, मेहनतीने राहुलने शास्त्रीय संगीतात स्वतःची जागा निर्माण केली. प्रत्येक सूर 'निरागस' लागलाच पाहिजे हा ध्यास घेतला. शास्त्रीय संगीतात प्रयोग करावेत हा विचार करून स्वतःच्या युट्यूब चॅनेलमार्फत अनेक जुनी, लोकप्रिय गाणी रसिकांसमोर नव्या रूपात मांडण्याचा अभिनव प्रयत्न त्याने सुरु केला, जो लोकप्रिय ठरला नसता, तर नवल! आजोबा वसंतराव देशपांडे, वसंतोत्सवापासून ते युट्यूबवरच्या अभिनव प्रयोगांपर्यंत खूप वैविध्यपूर्ण गप्पा या एपिसोडमध्ये रंगल्या आहेत. संगीतप्रेमींसाठी तर हा एपिसोड पर्वणी आहेच, त्यामुळे एपिसोड शेवट्पर्यंत नक्की बघा. Credits: Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar. Creative Head (थांब, मी सांगतो) - Vinod Satav. Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte. Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage. Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Aarya Gramopadhye, Maithily Apte. Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar. Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team. Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad. Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Rupesh Jagtap, Ankita Bhosale, Aarya Gramopadhye. Meta, Tags, Description, Time Stamps, Grammar Check (सोपस्कार) - Devika Joshi Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya

Comment