#Caste #Religion #Life
ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांचे विचार सुस्पष्ट आणि परखड असतात. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ते त्यांची मते व्यक्त करत असतात. मते मांडत असताना प्रेक्षकांच्यात आणि त्यांच्यात कोणताही आडपडदा असू नये या स्वच्छ उद्देशाने त्यांचा 'मनातलं' हा नवाकोरा कार्यक्रम प्रसिद्ध होतोय.
भारताच्या प्रजासत्ताक दिनापासून या कार्यक्रमाची सुरुवात होत असून पहिल्या भागात त्यांनी जात, धर्म, पंथ या सध्याच्या घडीला समस्त भारत देशाला सतावणाऱ्या चिंतेबद्दल विवेचन केलं आहे.
'जीवन जगताना, आपण कोण आहे ? आपल्या जीवनाचे उद्दीष्ट्य काय आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. बाह्य आणि आंतरीक शोध हे जीवनाच्या उद्दीष्टातून लागलेले आहेत. ते कोणत्याही धर्म, जात, पंथ यांच्या शोधातून झालेले नाहीत असं मत राजू परुळेकर यांनी व्यक्त केलं आहे.'
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया आपण आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.