MENU

Fun & Interesting

Ratnagiri Crime: नवऱ्याला बिअर पाजून खून, मृतदेहही लपवला, Dapoli मधली Bakkar Family Case नेमकी काय ?

BolBhidu 401,953 4 weeks ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #Ratnagiri #MaharashtraCrime रत्नागिरी आणि त्यातही दापोली. नुसतं नाव ऐकलं तरी आंब्याच्या बागा, निवांत समुद्रकिनारे, माडाची बनं, सुपारीची झाडं असं बरंच काय काय आठवतं. दिवसभर काम करावं आणि रात्री खळ्यात पडून भुताच्या गोष्टी ऐकाव्यात, गावच्या गझाली कराव्यात असं इथलं परफेक्ट वातावरण. दापोली तालुक्यातल्या गिम्हवणेमधलं उगवतवाडी हे गाव सुद्धा याच परफेक्ट वातावरणाचं उदाहरण. पण याच परफेक्ट वातावरणाला तडा गेला १४ जानेवारीला. संक्रांतीच्या दिवशी सगळ्या वाडीत चर्चा होती, निलेश बाक्कर बेपत्ता झाल्याची. निलेशच्या पत्नीनंच याबद्दलची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती. पोलिसांनी निलेशचा तपास करायला सुरुवात केली, गावातल्या लोकांनीही आपापल्या परीनं शोध घेऊन बघितला. पण प्रत्यक्षात काय झालं ? तर निलेशचा मृतदेह सापडला. अंगाला लोखंड बांधून विहिरीत ढकलून दिलेला, निलेशचा खून झाला होता, ज्यात मुख्य आरोपी होती, त्याची पत्नी नेहा बाक्कर. जिनं आधी नवऱ्याला बिअर पाजली आणि नंतर त्याचाच खून केला. रत्नागिरीला हादरा देणारं हे प्रकरण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment