#BolBhidu #RavindraDhangekar #EknathShinde
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राज्य काँग्रेस मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र आहे. राज्य काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षात अनेक बदल करण्यात आलेत. पण अशातच आता पुण्यातून काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पुण्याचे काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय. धंगेकरांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपला हा निर्णय जाहीर केला असून लवकरच त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे. यामुळं पुणे काँग्रेससाठी हा सगळ्यात मोठा सेटबॅक असल्याचं सांगितलं जातंय.
पण २०२३ ला कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला असमान दाखवून जायंट किलर ठरलेल्या रविंद्र धंगेकरांनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकरांना पक्षानं तिकीट देऊनही धंगेकरांनी काँग्रेसची साथ सोडण्याची नेमकी कारण काय, याबाबत आता चर्चा रंगल्यात. पक्ष सोडण्याबाबत माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी नक्की काय सांगितलं, धंगेकरांनी काँग्रेस सोडण्याची नेमकी कुठली कारणं सांगितली जातात, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/