#BolBhidu #SaifAliKhan #SaifAliKhanProperty
मुंबईतल्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान चर्चेत आलाय. सैफचा हल्लेखोर हा बांगलादेशी घुसखोर असल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. दरम्यान मंगळवारी सैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला. पण एकीकडं हे सगळं होत असतानाच मंगळवारी सैफला मोठा धक्का देणारी बातमी समोर आलीय. सैफच्या १५ हजार कोटींच्या संपत्तीवर आता गदा येण्याची शक्यता वर्तवली जातेय. मध्य प्रदेशात असलेल्या सैफची असलेली ही संपत्ती आता सरकारच्या ताब्यात येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं आता सैफच्या या संपत्तीवर केंद्र सरकारकडून जप्ती येण्याची शक्यता आहे. शत्रू संपत्ती कायद्यातील तरतुदीनुसार सैफची संपत्ती अडचणीत असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं आता सैफची १५ हजार कोटींची संपत्ती जप्त होणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. सैफच्या संपत्तीचं हे प्रकरण नक्की आहे काय, शत्रू संपत्ती कायदा नक्की आहे काय, त्यामुळं सैफची संपत्ती अडचणीत का आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/