६-संदीप खरे-गुरु ठाकूर-किशोर कदम-एकत्र | Sandip Khare, Guru Thakur, Kishor Kadam Marathi Poetry
२०११ साली (पहिल्यांदाच आणि एकदाच) ३ प्रतिभावान कवी, १ अप्रतिम गायक आणि एक तुफान लोकप्रिय निवेदक - मुलाखतकार एकाच व्यासपीठावर 'कवी आणि निसर्ग' या मराठी कवितांच्या मैफिलीसाठी एकत्र आले होते. संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम (सौमित्र), गायक मिलिंद इंगळे आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. संकल्पना अभिजीत टिळक यांची होती आणि 'अरण्यवाक्' या संस्थेसोबत हा कार्यक्रम सादर झाला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मैफिलीतील काही भाग आम्ही चोखंदळ मराठी रसिकांसाठी खुला करीत आहोत. रेकॉर्डिंग जुने असल्याने तुलनेने हलक्या व्हिडिओ क्वालिटीकरिता आम्हांस माफ करावे ही नम्र विनंती.