नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी झटणारे आणि लोकोद्धारासाठी कायम प्रयत्नशील असणारे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत एकनाथ महाराज. फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ समाधीस्त झाले. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते. संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते, असे म्हटले जाते संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचे पहिल्यांदा शुद्धीकरण करून ती शुद्ध प्रत लोकांना दिली. आजच्या घडीलाही प्रचलित असलेली, 'त्रिगुणात्मक त्रैमुर्ति' ही दत्तात्रयांची आरती संत एकनाथ महाराजांनी लिहिली आहे.