Satish Bhosale Beed: खोक्या भोसलेच्या घरी वनविभागाचा छापा शिकारीचं साहित्य जप्त, Suresh Dhas अडकणार?
#BolBhidu #SatishBhosale #SureshDhas
सतीश भोसले उर्फ खोक्या. वाल्मिक कराडनंतर रडारवर आलेला नवा गुंड. वाल्मिकसारखीच दहशत पसरवण्याचे आणि मारहाण करतानाचे त्याचे व्हिडिओ समोर आले. यामुळे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आल्याची चर्चा झाली. सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. तो सध्या फरार आहे. आता त्याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. वनविभाग आणि पोलिसांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली.
या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागल्या. सतीश भोसलेच्या घरी वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं. त्यात सतीश भोसले हा सुरेश धस यांना मटण पुरवायचा, असा आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला. त्यातच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं सतीश भोसलेला धमकी दिल्याची चर्चा सुरु झाली. काय आहे हे सगळं प्रकरण ? सतीश भोसलेनं काय-काय कारनामे केले आहेत? या प्रकरणात सुरेश धसांवर काय आरोप होत आहेत? या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/