#BolBhidu #SharadPawar #EknathShinde
स्ट्राईक रेटची चर्चा झाल्यानंतर विधानसभेत मात्र शरद पवारांना बॅकफूटवर जावं लागलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घवघवीत यश मिळवलेलं असताना, शरद पवारांना फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं. दुसरीकडं सत्तेत असूनही माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साईडलाईन करण्यात येत असल्याच्या बातम्या आल्या. परिणामी दोन्ही नेत्यांवर पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. राज्याच्या राजकारणात या चर्चा होत असताना थेट दिल्लीतच हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने शिंदेंना गौरवण्यात आलं. त्यावेळी पवारांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं उधळली. पवारांनी शिंदेंचं कौतुक केल्यानं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पवारांवर निशाणा साधलाय. पण या भेटीतून पवार आणि शिंदेंनी नेमकं काय साध्य केलंय, या भेटीचे अर्थ काय, या नेत्यांनी भविष्यातील कोणत्या राजकारणाची पेरणी केलीय, हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/