MENU

Fun & Interesting

श्री विश्वकर्मा जयंती उत्सव २०२५ व्हिडिओ भाग ०३., shree Vishwakarma jayanti utsav 2025 video part 3

SVK Vlogs 127 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मित्रांनो आमच्या आजिवली गावी श्री विश्वकर्मा मंदिर येथे श्री विश्वकर्मा यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो.यावेळी परिसरातील आजुबाजूच्या गावातील अनेक भाविक भक्त जण या उत्सवात सहभागी होतात.येथे प्रथम सकाळी श्री खर्चादेवी मंदिर भेट पालखी मिरवणूक होमहवन.श्री देव विश्वकर्मा यांच्या मुर्तीला अभिषेक.त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा तत्पश्चात आरती केली जाते.यानंतर दुपारी महाप्रसाद भंडारा यांचा कार्यक्रम होतो.
तद्नंतर महिला वर्गाचा हळदी कुंकू समारंभ संपन्न केला जातो.
संध्याकाळी भगवान विश्वकर्मा यांच्या पालखीची मिरवणूक शोभायात्रा अगदी वाजत गाजत होते. त्यानंतर विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळाचे सुस्वर भजन होते आणि नंतर करमणूकीचे कार्यक्रम केले जातात.
तर अशा प्रकारे श्री भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती उत्सव साजरा केला जातो.हा व्हिडिओ भाग ०३ आहे. आम्हाला उत्तेजन देण्यासाठी आणि आमच्या कामाला सहाय्य करण्यासाठी कृपया व्हिडिओ ला लाइक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि प्रथमच चॅनेलवर आले असल्यास सबस्क्राईब करा.घंटेच चित्र असलेले बटन नक्की दाबा.

Comment