एकादशी विशेष | श्रीगुरु बंडातात्या कराडकर कीर्तन | Shriguru Bandatatya Karadkar Kirtan
पुजनीय तात्यांचा अल्प परिचय -
वारकरी संप्रदायातील त्याग, संप्रदायनिष्ठा आणि चारित्र्यसंपन्न जीवनाचे मुर्तीमंत प्रतीक !
*व्यसनमुक्त युवक संघ या संघटनेद्वारा महाराष्ट्रभर व्यसनमुक्ती,राष्ट्रभक्ती,युवाशक्ती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य !
*प्रतापी संस्कार सोहळ्यातुन हजारो युवकांच्या जीवनाला सत्पथगामी व्यसनमुक्त करण्याचे सत्कार्य !
*राष्ट्रबंधु राजीवजी दीक्षित गुरुकुलामार्फत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाला संस्कारसंपन्न, आदर्श बनविण्याचे महत्कार्य !
*गोरक्षा, गोसेवा, आयुर्वेद ,सेंद्रिय शेती , स्वदेशी आंदोलन, भ्रष्टाचार निर्मुलन ,वारकरी आस्था विध्वंसक डाऊ कंपनी विरोधातील यशस्वी आंदोलन,गावोगावी दारूबंदी अशा राष्ट्रकार्यांनी भारावलेले जीवन !
*"नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर" या उक्तीप्रमाणे जगणारे संतवीर, युवकमित्र, प्रखर देशभक्त, निर्भीड, निस्वार्थी, स्वाभिमानी जीवन आणि वा. सां. श्रद्धास्थान !
*विठ्ठलाचे निष्ठावंत वारकरी आणि शिवबांचे शुर धारकरी, गाढे इतिहास अभ्यासक, भागवत, महाभारत, रामायण, कपिलगीता प्रवक्ते !
*छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरित्राचे सखोल अभ्यासक !
*महिला प्रतापी संस्कार सोहळ्याद्वारा स्त्रीयांमध्ये संस्कृती आणि राष्ट्राभिमान जागृती !