#BolBhidu #MaharashtraKesari #ShivrajRakshe
अहिल्यानगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतला राडा सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला. मॅटवरच्या फायनलवेळी शिवराज राक्षेनं आपल्याबद्दल चुकीचा निर्णय दिल्याची तक्रार केली आणि त्यानंतर रिप्लेची मागणी मान्य न झाल्यानं पंचांशी हुज्जतही घातली. त्यानंतर किताबाच्या लढतीत महेंद्र गायकवाडनं पंचांचा निर्णय न पटल्यानं १६ सेकंद बाकी असतानाच कुस्ती सोडून दिली. शिवराजनं पंचांची कॉलर धरत त्यांना लाथ मारली, तर महेंद्रनं कुस्ती सोडल्यावर त्याच्या समर्थकांनी खुर्च्यांची मोड तोड केल्याचा आरोप झाला. या सगळ्यामुळं महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं.
महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोन्ही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबीत करण्यात आलं. पण महाराष्ट्राची शान असणाऱ्या या स्पर्धेला गालबोट लागण्याची ही पहिलीच वेळ आहे का ? तर नाही. मागच्या तीन वर्षात महाराष्ट्र केसरी स्पर्धा गाजली आहे, ती वेगवेगळ्या वादांमुळे, हे वाद नेमके काय आहेत ? संघटनांपासून मैदानातल्या घडामोडींपर्यंत महाराष्ट्र केसरीमध्ये नेमकं काय घडतंय, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/