दर्जेदार किर्तन - ह.भ.प.सोपान महाराज सानप | sopan maharaj sanap | kirtan | किर्तन सोहळा | किर्तन
श्री दत्त मंदिर पंचवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह,जोर्वे सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब (दादा) थोरात व प्रथित यश उदयोजक स्व. पंडितराव (तात्या) थोरात यांच्या स्मरणार्थ आयोजक - समस्त ग्रामस्थ जोर्वे, ता.संगमनेर किर्तनकार - ह.भ.प सोपान महाराज सानप गायक - ह.भ.प. विराज महाराज मगर, ह.भ.प.प्रविण महाराज पांडे, पखवाज - ह.भ.प. संकेत महाराज आरोटे, टाळकरी - समस्त ग्रामस्थ जोर्वे साऊंड व्यवस्था - अशोक काशिद -९६५७१७१७०६.
राम कृष्ण हरी...!!!
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#kirtansohala
#sopanmaharajsanap