सुप्रिया सुळे यांची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या, प्रभावी खासदार अशी संपूर्ण देशाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी सुप्रिया सुळे यांची एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संपूर्ण देशाला अपरिचित अशी सुप्रिया सुळे यांची बाजू ऐकायला मिळाली. संसदीय राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल. महाराष्ट्रातील राजकारण, महाविकास आघाडी, ईडी सरकार याबाबत सुप्रिया सुळे यांनी त्यांची मते मांडली. पवार कुटुंबाबद्दल बाहेर लोकांना काय वाटतं, सध्याच्या सरकारची कामगिरी कशी आहे यावरही त्या बोलल्या. ही संपूर्ण मुलाखत ही सुप्रिया सुळे यांच्या आजवरच्या इतर मुलाखतींपेक्षा सर्वार्थाने वेगळी अशी होती.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.