MENU

Fun & Interesting

जबरदस्त फ्लेवरफूल भाजी सुरती उंधीयू | Surati Undhiyu | Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta 52,167 2 months ago
Video Not Working? Fix It Now

#सुरतीउंधियू #उंधियू #गुजरातस्पेशलभाजी #हिवाळास्पेशलभाजी #undhiyu #suratiundhiyu #gujratispecialsabji #trendingrecipe #undiyurecipe #leenassugrankatta #leenajoshi सुरती उंधियू भाज्या - तुरीचे दाणे १ वाटी सुरती पापडी २०० ग्रॅम मटार २ वाट्या छोटी वांगी ४-५ छोटे बटाटे ४-५ रताळे १ कोनफळ (कंद) २५० ग्रॅम कच्ची केळी २ लसूण पात ४ जुड्या ओली हळद २-३ इंच कोथिंबीर बारीक चिरलेली मेथी २ कप आलं मिरची पेस्ट ३-४ चमचे लसूण पेस्ट १ चमचा इतर साहित्य :- नारळाचा चव दीड वाटी लिंबाचा रस ४-५ चमचे तीळ २ चमचे कच्च्या दाण्याचे कूट २ चमचे गव्हाचे पीठ पाऊण वाटी बेसन पाव वाटी ओवा ३-४ चमचे हिंग १-२ चमचे हळद १ चमचा तिखट १ चमचा धनेपूड २ चमचे जिरेपूड २ चमचे गोडा मसाला १ चमचा गरम मसाला १ चमचा साखर ३-४ चमचे मीठ २-३ चमचे किंवा चवीनुसार बेकिंग सोडा १ चमचा शेंगदाणे तेल कृती स्टेप १ : कुकरमध्ये तेल गरम करून थोडासा ओवा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद घालून आता त्यात सुरती पापडी, तुरीचे दाणे आणि मटार घालावेत. अर्धी वाटी पाणी घालून एकदा सगळे नीट मिक्स करून घ्यावे. आता झाकण लावून एक शिट्टी करून घ्यावी. स्टेप २ : एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली मेथी, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी लसूण पात घ्यावी. आता त्यात हळद, तिखट, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, लिंबाचा रस, मीठ, साखर, तीळ, ओवा, हिंग घालून सगळे नीट मिक्स करून घ्यावे. चांगले कालवून घ्यावे. मेथीला पाणी सुटले की त्यात गव्हाचे पीठ व बेसन घालून सगळे नीट मळून घ्यावे. आता याचे छोटे छोटे मुटके करून घ्यावे. स्टेप ३: तेल मिडीयम आचेवर गरम करून घ्यावे. आधी त्यात मेथीचे मुटके तळून घ्यावेत. मग क्रमाक्रमाने बटाटे, रताळे, कोनफळाचे तुकडे ६० ते ७०% पर्यंत तळून घ्यावेत. स्टेप ४: उंधियूचा मसाला - मिक्सरच्या भांड्यात नारळाचा चव, मटार, लसणाची पात, कोथिंबीर, किसलेली ओली हळद, दाण्याचे कूट, तीळ, आलं मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, साखर, धनेपूड, जिरेपूड, बेकिंग सोडा घालून सगळे किंचित जाडसर वाटून घ्यावे. स्टेप ५: वांग्यामध्ये मसाला भरून घ्यावा. बटाटा, कोनफळ, रताळे यांना पण थोडा मसाला चोळून ठेवावा. हे सगळे १० मिनिटे मुरण्यासाठी ठेवावे. स्टेप ६: एका कढईत तळण्यासाठी जे तेल वापरले होते त्यातलेच तीन चार पळ्या तेल घालावे. त्यात ओवा व हिंग घालावा. आता त्यात शिजवलेली पापडी, मटार, तुरीचे दाणे घालावेत. मग त्यात मसाला भरलेली वांगी, मसाला लावलेले बटाटे, रताळे आणि कोनफळ घालावे. आता कच्ची केळी चिरून घालावीत. आता उरलेला सगळा मसाला घालावा. लसूण पात घालावी. सगळ्यात शेवटी मेथीचे मुटके घालून थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे ठेवावे. वाटल्यास कढईखाली तवा ठेवावा. म्हणजे भाजीला चांगला दम लागेल. भाजी झाल्यावर वरुन नारळ, कोथिंबीर घालावी. आपला मस्त सुरती उंधियू तयार आहे. Video shooting & editing: Varun Damle +91 95459 08040

Comment