#BolBhidu #SureshDhas #DevendraFadnavis
बुधवारी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात उपसा सिंचन योजनेच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उद्घाटन करण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यात होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांच्या या दौऱ्याकडं सगळ्यांचंच लक्ष होतं. प्रकृतीच्या कारणांमुळं आष्टीतल्या या कार्यक्रमाला धनंजय मुंडें गैरहजर होते. पण फडणवीस त्यांच्याबद्दल काही बोलणार का, याची सगळ्यांना उत्सुकता होती. पण हा कार्यक्रम गाजला तो आमदार सुरेश धस आणि आमदार पंकजा मुंडेंच्या भाषणांनी. मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद हैं, असं म्हणत सुरेश धसांनी फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केलं. तर त्यांच्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडेंनीही धसांना टोले लगावले.
पण गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या धसांनी या कार्यक्रमात फडणवीसांच्या केलेल्या कौतुकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मेरे पास देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद है, असं धसांनी म्हटल्यामुळं, गेल्या दोन महिन्यांपासून सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमागं फडणवीसांचीच अदृश्य शक्ती आहे का, असं आता म्हटलं जातंय. या चर्चांमागची नेमकी कारण काय, धसांच्या माध्यमातून फडणवीसांनी खरंच काही डाव साधलेत का, पाहुयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/