Suresh Dhas आणि सोळंकेंना धक्का,Dhananjay Munde स्वागताला,Ajit Pawar यांनी बीड दौऱ्यातून काय साधलं ?
#BolBhidu #AjitPawarBeed #DhanajayMunde
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घ्यायला सुरुवात झाल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरायला लागली. त्यानंतर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं. त्यामुळं बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजित पवार कठोर पावलं उचलतील असं बोललं जातंय. त्यातच अजित पवारांनी ३० जानेवारीला बीड दौरा केला. पालकमंत्री झाल्यापासून अजित पवारांचा हा पहिलाच बीड दौरा असल्यामुळं त्याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. बीडमध्ये पाऊल ठेवतचा अजित दादांनी बैठका, आदेश आणि कारवाईचे इशारे द्यायला सुरुवात केली. अजितदादांनी बीडमध्ये जाऊन एकीकडं पदाधिकाऱ्यांना शिस्तीत काम करण्याचा इशारा देत धनंजय मुंडेंचं नाव न घेता कानपिचक्या दिल्या,
तर दुसरीकडं जिल्हा नियोजन सदस्य समितीवरुन अजितदादांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना हटवलं. त्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून बीडमध्ये होत असलेल्या सगळ्या घडामोडींकडं लक्ष देऊन अजित पवार आता बीडचे पालकमंत्री म्हणून अँक्शन मोडमध्ये आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. बीडमध्ये गेल्यानंतर अजितदादांनी नक्की काय काय निर्णय घेतले? अजितदादांनी धस आणि सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीवरुन हटवून नक्की कुणाचा कसा गेम केलाय पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/