#BolBhidu #DattaGade #SwargateCase
७० तास, दत्तात्रय गाडे हे नाव ७० तास पोलिसांच्या डोळ्यांसमोर घुमत होतं. पहिले २४ तास या घटनेची कल्पना पोलिसां व्यतिरिक्त कुणालाच नव्हती, पण त्या २४ तासांनंतर बातमी माध्यमांमध्ये आली. साहजिकच या घटनेची चर्चा वाढली, घड्याळाचे काटे जसे पुढं जात होते, तसा पोलिसांवरचा दबाव वाढत होता, त्यांना एकच प्रश्न छळत होता, दत्ता गाडे कधी सापडणार. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी शिरुरमधल्या गुणाट गावात तळ ठोकला होता, २५ फेब्रुवारीचा दिवस गेला, २६ फेब्रुवारीचा दिवस गेला, २७ फेब्रुवारीचे २४ तास संपले होते आणि मग आली २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीची ती वेळ, रात्रीचे १ वाजून १० मिनिटं आणि स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे पोलिसांच्या ताब्यात आला. पण विषय इथंच संपला का ? तर नाही. पोलिसांनी दत्ताची चौकशी केली आणि त्याच्यात त्यानं एक खळबळजनक दावा केला. दत्ता गाडे पोलिसांपासून लपला होता तिथपासून त्यानं दिलेल्या धक्कादायक जबाबापर्यंतचे ते ७० तास कसे होते ? त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/