तळ कोकणात पारंपारिक बागायती शेती मध्ये औषधी झाडांसोबतच दुर्मिळ रान फळे जपलेली आढळतात... शेकरू वानर, हॉर्नबिल ,कांडेचोर , साळिंदर सारखे हे आमचे जंगलातील मित्र ह्या रानटी फळांतून आपले पोट भरतात.. चाफरा , जाम, बिमला, करमाळा, कोकम, करवंद,अननस, फणस,रिंगी,जगमा, वटा (वाट्सोल) असे अनेक मोठे रानटी वृक्ष स्वतःसाठी नव्हे तर रान फळातून पशू पक्ष्यांची पोटे भरावीत म्हणून राखलेली आढळतील..
सरसकट सगळी झाडे तोडून केवळ आंबा काजू किंवा नारळ चे monoculture केल्याने जंगली प्राण्यांचे खाण्याचे हाल झाल्याने ते भुकेपोटी नाईलाजाने तुमच्या पिंकावर ताव मारतात..त्यांची जंगली फळे आपण जपायला हवीत..ह्यालाच खरे सहजीवन म्हणतात ..
मांगर जवळच्या बागायतीत तसेच कातळ सड्यावर च्या अश्या दुर्मिळ रान फळांची सफर आम्ही पर्यटकांनी घडवली....रान फुलांच्या सुगंधाने आणि ताज्या फळांनी बहरलेल्या तळ कोकणातील हे स्वाद सुगंधाचे पर्यटन जरूर पाहा🌳❤️🙏
Contact for Mangar Farmstay
7588531978