नाशिकपासून १८ किमीवर असलेल्या "गडगड सांगवी" गावाच्या मागे एक डोंगररांग पसरलेली आहे स्थानीक लोक या डोंगररांगेस अंबोली पर्वत या नावाने ओळखतात. या पर्वत रांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. यातील उजवीकडील शिखराला ‘अंबोली‘ व डावीकडील शिखराला ‘अघोरी’ या नावाने ओळखतात. या दोन शिखरांच्यामध्ये असलेले शिखर म्हणजे ‘गडगडा किल्ला’ होय. हा किल्ला सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. किल्ल्याचे स्थान पाहाता याचा उपयोग मुख्यत: टेहाळणीसाठी केला जात असावा.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबईपासून १६३ कि.मी वर (घोटी पासून १६ किमी) व नाशिकच्या अलिकडे १८ कि.मी वर वैतरण्याला जाणारा फाटा आहे. या फाट्यापासून २ किमी वर "वाडीव्हीरे" गाव आहे. गावातून बाहेर पडल्यावर एक चौक लागतो. या चौकातून उजव्या हाताचा रस्ता ४ किमी वरील "गडगड सांगवी" या गडाच्या पायथ्याच्या गावात जातो. या रस्त्याच्या सुरुवातीलाच एक कमान उभारलेली असून त्यावर ‘हनुमान व भवानी मंदिर, अंबोली पर्वत परिसर, गडगड सांगवी’ असे लिहलेले आहे. नाशिकहून दर तासाला वाडीव्हीरे गावात जाण्यासाठी एसटी बस आहेत, परंतू गडगड सांगवी गावात एसटी जात नाही. वाडीव्हीरेला उतरुन ४ किमी चालत गडगड सांगवी गावात जावे लागते. खाजगी वाहनाने गडगड सांगवी गावापर्यंत जाता येते.
राहाण्याची सोय
गडगड सांगवी गावातील शाळेच्या पडवीत १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या हनुमान मंदिरात १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय
जेवणाची सोय स्वत: करावी किंवा गडगड सांगवी गावापासून मुंबई - नाशिक महामार्ग ६ किमी वर आहे, तेथे अनेक धाबे आहेत.
पाण्याची सोय
१) गडावरील प्रवेशद्वाराजवळील टाक्यात पिण्यायोग्य पाणी १२ महिने उपलब्ध असते. २) हनुमान मंदिराजवळ असलेल्या विहिरीत बारामाही पाणी असते.
Music from #InAudio: https://inaudio.org/
Track Name.