#BolBhidu #TituSingh #IndianRebirthCase
शाळेत असताना शाहरुखचा एक पिक्चर बघितला होता. ओम शांती ओम. पिक्चरमध्ये शाहरुखची सिक्स पॅक बॉडी आणि बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी दिपिका सगळ्यांनाच खूप आवडली होती. पण त्याचबरोबर जास्त चर्चा झाली होती या पिक्चरच्या स्टोरीची. शांतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ओम पुनर्जन्म घेतो आणि शांतीच्या मारेकऱ्याला शिक्षा देतो. आता स्टोरी टिपिकल वाटत असली तरी पुनर्जन्माचा प्लॉट इंटरेस्टिंग होता. असं बदल्याची आग उरात घेऊन पुनर्जन्म घेणाऱ्या हिरो-हिरोईनचे पिक्चर आपल्याला खोऱ्यानं सापडतील.
पण प्रत्यक्षात पुनर्जन्म वगैरे या गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही. पुनर्जन्माच्या गोष्टी एकतर गोष्टीच्या पुस्तकात किंवा पिक्चरमध्ये त्या काही तासांपुरत्या खऱ्या वाटतात आणि पुन्हा आपण आपला जन्म वाया जाऊ नये म्हणून कामाला लागतो. पण उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावातल्या टिटू सिंगची पुनर्जन्माची स्टोरी पिक्चरची नाही, रिअल आहे. आपल्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी टिट्टीू सिंगनं पुनर्जन्म घेतल्याची ही घटना ८० च्या दशकात समोर आली आणि त्याची चांगलीच चर्चा झाली. टिटू सिंगच्या पुनर्जन्माची ही गोष्ट आहे काय, या गोष्टीत खरंच तथ्य आहे का, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/