आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटो ऑम्लेट अगदी कमी वेळामध्ये खूप कुरकुरीत असे रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया.
साहित्य-
टोमॅटो दोन ते तीन
मिरची
आलं
लसणाच्या पाकळ्या
ओवा
हरभरा डाळीचे पीठ
तांदळाचे पीठ
कोथिंबीर
कांदा
चवीनुसार मीठ
कृती-
आधी आपल्याला टोमॅटो मोठे मोठे पीस मध्ये आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये हरभरा डाळीचे दोन वाटी पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ त्याच्यामध्ये आपण बनवलेली टोमॅटोची पेस्ट अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले कोथिंबीर घालायचा आहे, गॅस वरती पॅन ठेवून थोडं गरम झाल्यानंतर थोडं तेल लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ऑम्लेट आपल्याला घालून घ्यायचा आहे, झाकण लावून दोन ते तीन मिनिटांसाठी वाफवायच आहे .त्याच्यानंतर पलटा आहे. दुसरी बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, आपलं टोमॅटो ऑम्लेट 10 मिनिटात खाण्यासाठी तयार.
माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू.
Amazon -https://www.amazon.in?&linkCode=ll2&tag=sneha199300-21&linkId=90ba10b804315c5936d999d5a817f40c&language=en_IN&ref_=as_li_ss_tl
#tomato #food #tomatoes #foodie #foodporn #instafood #foodphotography #healthyfood #cheese #yummy #salad #delicious #homemade #dinner #foodstagram #onion #vegetables #gardening #cucumber #garden #lunch #healthy #pasta #foodblogger #vegan #tomate #garlic #lettuce #pizza #basi#snehasrecipes.