महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत.त्यातीलच एक पवन मावळ! या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळते, उंच डोंगर,धडकी भरवणारे उभे कडे,दऱ्यांतून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणा मुळे आपसूकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. याच पवन मावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत.
हा किल्ला मावळ प्रदेशात आहे ज्यावर मराठा राजांचे राज्य होते. हा किल्ला 3500 फूट उंचीवर बांधण्यात आला असून सुमारे 1200 फूट उंच डोंगराळ भाग आहे.
पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग, आणि तिकोना हे किल्ले आहेत.यातील तुंग किल्लाची माहिती पाहत असताना त्यांचे भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी व पवन मावळातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे