#BolBhidu #UddhavThackeray #RajThackeray
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणार. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो. उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नाला हे उत्तर दिलं. त्यानंतर शनिवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात ठाकरे बंधुंचे फोटो फ्रंट पेजवर झळकले. मनसेच्या जन्मानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो सामनात आले. त्यात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येणारच, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान आणि सामनात आलेले फोटो, यामुळं ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या शक्यता आता फायनल होण्याचे संकेत आहेत. याबाबत दोन्ही बाजूनं अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पडद्यामागं बऱ्याच गोष्टी घडत असल्याचं पहायला मिळतंय.
सध्या दोन्ही ठाकरेंना आपल्या पक्षांना मोठा बूस्ट देण्याची गरज आहे. त्यासाठी आगामी काळातल्या महापालिका निवडणुका ही दोघांसाठी महत्वाची आणि कदाचित शेवटची संधी असेल, असंच बोललं जातंय. त्यामुळं त्यासाठी दोन्ही पक्ष कामाला लागलेत. आता मराठी माणसाच्या मनावर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे नावाचं गारुड आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी ही याची साक्ष देते. त्यामुळं ठाकरे ब्रँड एक झाला तर त्याचा मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा फायदा होईल, अशा चर्चा आहेत. पण खरंच असं होईल का, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षांची ग्राऊंडवरची ताकद किती आणि हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचा दोघांना कुठे, कसा आणि किती फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/