#BolBhidu #RajanSalvi #EknathShinde
मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेली कामं मी आजपर्यंत केलीत. त्यांच्याच विचारांचं काम मी पुढे नेणार आहे, आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत हा निष्ठावान शिवसैनिक ठाकरेंचाच राहणार” असं माजी आमदार राजन साळवी यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर म्हटलं होतं. आता त्याच राजन साळवींनी बुधवारी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुरुवारी लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंचे निष्ठावान अशी ओळख असलेल्या साळवींनी शिंदेंचं नेतृ्त्व स्वीकारल्यानं उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. साळवींच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेक चर्चांना उधाण आलंय. मात्र ठाकरेंना धक्का देणाऱ्या साळवींची राजकीय वाटचाल कशी राहिलीय, त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/