#BolBhidu #UniversalPensionScheme #PensionNews
1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर केला पण त्याआधीच म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस लागू केली होती. पण, भारतात फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच पेन्शन दिली जाते. खासगी क्षेत्रातही काही कर्मचाऱ्यांनाच पेन्शनचा लाभ मिळतो. असंघटीत क्षेत्राला कोणतीही पेन्शन लागू होत नाही याचाच विचार करून आता सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी नवी पेन्शन योजना आणण्याच्या विचारात आहे. त्याला 'युनिव्हर्सल पेन्शन स्कीम' असे नाव दिले जाणार आहे.
एकदा रिटायर झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य कष्ट केलेल्या प्रत्येक नागरीकाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा त्याचा उद्देश असणार आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या योजनेवर काम सुरू केले आहे. थोडक्यात फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी नोकरी आणि नोकरी नसलेल्यांचाही यात सहभाग असणार आहे. म्हणजेच असंघटित कामगारांनाही याचा लाभ घेता येणार आहे. काय आहे हि स्कीम हे आज आपण जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/