#bbcmarathi #upsc #upscresults #swatirathod
सोलापूरच्या स्वाती राठोडने UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. बंजारा समाजाच्या या राठोड कुटुंबाने तिच्या या यशासाठी जाणीवपूर्वक वेगळी पावलं उचलली. स्वातीने UPSC परीक्षा आजवर पाचवेळा दिली होती, पण यश आलं सहाव्या प्रयत्नात, ज्यात ती देशात 492व्या क्रमांकावर आली. दरवर्षी लाखो तरुण ही परीक्षा देतात. त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांच्या पदरी यश पडतं. मग आयुष्यातील उमेदीची इतकी वर्षं एका परीक्षेला देणं स्वातीला कितपत योग्य वाटतं? UPSC शिवाय प्लॅन-बी असणं किती महत्त्वाचं आहे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडीओ.
रिपोर्ट : गणेश पोळ, बीबीसी प्रतिनिधी
एडिट - मयुरेश
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi