नीता अडूरकर रेसिपीज चॕनेलवर मी नीता आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते.
स्वयंपाक करणे ही एक कला आहे. दररोज वेगवेगळे पदार्थ बनविताना खूप काही प्रयोग करून पाहता येतात. 'एखाद्याच्या हाताला चव असते' असे म्हणतात, तेव्हा खरे तर पदार्थ करताना त्यामध्ये बरोबर सामावून जाईल आणि खुमासदार बनेल अशी पाककृती करण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करते. नवनवीन पदार्थ बनवून संबंधितांना खायला घालण्यात केवढा तरी आनंद आणि कौशल्यही आहे. त्यादृष्टीने हे चॕनेल म्हणजे खवैय्यांसाठी एक छानशी मेजवानी आहे. तुम्ही शाकाहारी असा की मांसाहारी; तुम्ही मसालेदार, झणझणीत तिखट खाणारे असा किंवा गोड... तुम्हाला हवी ती डिश उपलब्ध करून देणारे हे चॕनेल तुमची दाद घेऊन जाईल.