पालघर न्यूज नेटवर्क चॅनल हे पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड,जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, वसई, आणि पालघर या सर्व तालुक्यांतील गावखेड्यांतपासून तर शहरापर्यंतच्या बातम्या कव्हरेज करणारे विश्वासू चॅनल आहे. राजकीय घडामोडी , नैसर्गिक आपत्ती, गुन्हेगारी जगतातील घटना, खेळ - स्पर्धा, सामाजिक कामे-शिबिरे व सांस्कृतिक-धार्मिक-परंपरा-रूढी जपणाऱ्या विविध स्तरातील माहिती व बातम्या दाखवणारे एकमेव चॅनल आहे.
सर्वात जलद व जशीची तशी दाखवणारे एकमेव चॅनल म्हणजेच पालघर न्यूज नेटवर्क.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे आणि येथील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता कटिबद्ध असलेल्या पालघर न्यूज नेटवर्क चॅनल अगदी सोप्या मराठी भाषेमधे जिल्ह्यातील घराघरात पोचलेला एकमेव मराठी न्यूज यू ट्यूब चॅनल असुन सर्वांच्या पसंतीमध्ये खरा उतरला आहे.
पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनारे पासून तर जिल्ह्याच्या जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम भागांमधील डोंगराळ परिसरात राहणार्या नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या ते सपाट जागेवरील असलेल्या नदीकिनारी वसलेल्या गावांपर्यंत च्या नागरिकांना अचूक विश्लेषण करणारे पालघर न्यूज नेटवर्क.