Ashwini's Swadishta Kitchen
नमस्कार,
मी सौ.अश्विनी डिके.आपल्या पारंपारिक स्वयंपाक कृती आणि नवीन काळाशी मिळत्या जुळत्या पाककृती या चॅनलवरून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.माझी दोन पुस्तके,एक 'स्वादिष्ट मेनू 'हे पुस्तक, मेनू आणि रेसिपीशी रिलेटेड आहे आणि दुसरे 'मराठी सण मराठी रेसिपी' हे पुस्तक,12 मराठी महिन्यांमध्ये येणारे सण आणि त्यांचे महत्व,त्यावेळी केले जाणारे विशिष्ट पदार्थ,यासंबंधी माहिती देणारे आहे.'मराठी सण मराठी रेसिपी' हे पुण्यातील प्रसिद्ध 'सकाळ प्रकाशन' यांनी प्रकाशित केले आहे.ही दोन्ही पुस्तके संग्रही ठेवल्यास तुम्हाला निश्चितच त्याचा उपयोग होईल. परदेशी असणाऱ्या,वा तुमच्या नवविवाहित सुना,मुलींना त्याचा निश्चितच उपयोग होईल.
राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या लेखिका सौ शामला दिलीप पानसे पुणे,यांनी पुस्तकाबद्दल अभिप्राय देताना पुढील उद्गार काढले आहेत,"सण-उत्सव हे आनंद प्राप्त करून देतात. त्या निमित्ताने केले जाणारे विशिष्ट खाद्यपदार्थ आनंदा सोबतच आरोग्यही देतात. सौ अश्विनी अजित डिके यांनी प्रस्तुत पुस्तकातून तोच प्रयत्न केला आहे.आपला सांस्कृतिक वारसा पुढे जपण्यासाठी प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक आहे."