MENU

Fun & Interesting

आपली संस्कृती

आपली संस्कृती

सर्व प्रथम जय गुरु,
नेताजी हिरामन मेश्राम धानोरा तालुक्यातील वनात असलेलं इवलशं माझं कुडकवाही हे गांव जि.गडचिरोली (महाराष्ट्र)
आपली संस्कृती चॅनलच्या माध्यमातून मराठी, हिंदी भाषेतील भजन, अभंग व गौळणी इ. आपल्या समोर सादर करून ग्रामीण भागातील पारंपारिक कलेला वाव मिळावा व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून समाज जागृतीचा कार्य चॅनल च्या माध्यमातून व्हावा हाच मुख्य उद्देश.
आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात संतांचे विचार ल़ोप पावू नये. म्हणून वं. राष्ट्रसंत म्हणतात 'अब साधन बदलना होगा,घर -घर यही गाना होगा '' यासाठी चॅनलच्या माध्यमातून एक अल्पसा प्रयास.
मला आशा आहे की, आपण चॅनलशी जुळून व चॅनलच्या माध्यमातून संतांचे विचार इतरांपर्यंत पोहोचायला आपल्या कडून तन-मनानी मदत होऊन सत्कार्याला हातभार लावाल हीच आपल्याप्रर्थी प्रार्थना.

परत आपणास विनंती आहे की, चॅनल वर प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये कलाकार हे गावगाडयातील आहे.काही चूका असतील तर गोड करून घ्यावी.
जय गुरु 🙏

आपला विनम्र
श्री नेताजी एच. मेश्राम

Please subscribe

Email -