For the love of good food:)
Aai Cha Khau | Recipes by Madhura Ratnaparkhi
Cooking for my loved ones has always been my passion. I decided to share this passion with everyone & started 'Aai Cha Khau', a healthy & tasty recipe channel. Hope you all try my recipes & feel my love.
नवीन नवीन पदार्थ करून बघण्याची आणि प्रेमाने खाऊ घालण्याची आवड मला काही शांत बसू देईना. आदीत च्या जन्मानंतर फोकस लहान मुलांना आवडतील , झटपट तयार होतील आणि पौंष्टीकही असतील अशा पदार्थांकडे वळला. मग असं वाटलं, या रेसिपीज शेअर केल्या तर सगळ्यांनाच फायदा होईल. मग 'आईचा खाऊ ' ची कल्पना डोक्यात आली. असं वाटलं इथं काही पारंपारिक पदार्थही शेअर करावे जे चटपटीत ही आहेत आणि आणि पौंष्टीक ही. मग काय उत्साहानी कामाला लागले आणि खूप सारे पदार्थ सुचायला लागले. आणि आज तुमच्या उदंड प्रतिसादामुळे माझा उत्साह नक्कीच द्विगुणीत झाला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार . भेटत राहूच आणि शेअर करु नवीन नवीन रेसिपीज .........