MENU

Fun & Interesting

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

श्री नामदेव महाराज शास्त्री हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तन व प्रवचनकार असून त्यांचे सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील ' वारकरी शिक्षण संस्था ' येथे झालं, त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या 'न्यायशात्रा'चं शिक्षण श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची ' न्यायाचार्य ' ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम. ए. ( मराठी ) करून 'वारकरी संतांची कूटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्. डी. संपादन केली. सध्या ते श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन - अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे वक्ते आहेत. " त्यांची कीर्तनं व प्रवचनं ' हे ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असुन यात मानसिक समस्येचं समाधान आहे.