छत्रपती शिवराय आणि अनेक मावळ्यांनी प्राणपणाने जपलेले आपले किल्ले भविष्यातील पिढ्यांना समजावे, म्हणून या किल्ल्यांच्या माहितीसाठी केलेला आटापिटा म्हणजे "दुर्गांची दिशा"..
तंत्रज्ञानाने आपली प्रगती झाली, त्यामुळे हल्ली एखाद्या किल्ल्यावर जायचे कसे? तिथे कोणत्या वास्तू आहेत? या सगळ्या गोष्टी आता आपल्याला एक क्लिक वर मिळतात, परंतु एखादा किल्ला डोळसपणे पाहायचा कसा? त्याचा इतिहास काय? त्या गडाचे महत्व काय आहे, या प्रश्नांची उत्तरे या चॅनेल च्या माध्यमातून देण्याचा आटोकाट पर्यत करतो.