MENU

Fun & Interesting

Vada Pav Recipe | वडा पाव | शेवटी आली रेसिपी यु ट्यूबवर..१९८९ साली प्रसिद्ध झालेल्या वडा पावची

Gharcha Swaad 1,605,348 7 years ago
Video Not Working? Fix It Now

Vada Pav Recipe | Old Authentic Way | Mumbai famous Street Food | Best Snacks Recipe by Gharcha Swaad | वडा पाव साहित्य - १.२५ किलो बटाटे, १ tbl spn राई , १ tbl spn जीरे, २ tea spn हळद, बेसन ( चण्याचं पीठ ) ३५० ग्रॅम, फोडणीसाठी ६ tbl spn तेल, १ tea spn हिंग, २ tbl spn धने, १ tbl spn मेथी, ९/१० बारीक चिरलेल्या किंव्हा ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, १०/१२ कडीपत्त्याची पाने, ४ tbl spn आले लसूण ठेचून घेतलेले, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, वडे तळण्याकरिता तेल, चवीनुसार मीठ आणि नरम पाव लादी. चटणीसाठी - २ बटर, ८/९ लसूण पाकळ्या, पुरेसा वाड्याचा चुरा, १ tbl spn मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. कृती - सर्व बटाटी उकडून घ्यावीत आणि त्यांची साले काढावीत. एका पातेल्यात फोडणीसाठी तेल घेऊन गरम करा आणि त्यात राई, जीरे, हळद, हिंग, धने, मेथी, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, कडीपत्त्याची पाने, आले लसूण ठेचलेले घालावे आणि फोडणी छान खमंग सुवास सुटे पर्यंत परतावी. फोडणी तयार झाल्यावर उकडलेल्या बटाट्याचा कुसकुरा करावा आणि त्यात हि तयार फोडणी घालावी. सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे. सर्व मिश्रण एक जीव करून गोल आकारात किंव्हा चपटे वडे तयार करून घ्यावेत. आता एका पातेल्यात बेसन घेऊन त्यात ½ ग्लास पाणी आणि मीठ आवश्यकतेनुसार घालावे आणि पात्तळ-घट्ट असे मिश्रण तयार करून घ्यावे. कढईत तेल गरम करून घ्यावे. तयार वडे बेसनाच्या मिश्रणात घोळून तेलात सोनेरी रंगापर्यंत तळावे. आता मिक्सरच्या भांड्यात वड्यांचा चुरा घ्यावा आणि सोबत बटर, लसूण पाकळ्या, मिरची पावडर व चवीनुसार मीठ घालून दरीदरीत तिखट चटणी तयार करून घ्यावी. नरम पाव मधोमध चिरून त्यात चटणी आणि थोडा वड्यांचा चुरा घालून वडापाव तळलेल्या मिरची आणि चिरलेल्या कांद्या सोबत गरमागरम सर्व्ह करावा. धन्यवाद !

Comment