MENU

Fun & Interesting

Vaishnavi Hagawane: NCPच्या Rajendra Hagawane यांच्या सुनेच्या प्रकरणात PM रीपोर्टनंतर ट्विस्ट ?

BolBhidu 243,344 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #VaishnaviHagawne #RajendraHagawane दोन तीन दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेनं स्वतःला संपवल्याची. राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ त्यामुळं ही घटना उघडीकस आल्यावर त्याची बरीच चर्चा झाली. वैष्णवीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण काय असे अनेक प्रश्न यानंतर विचारले गेले. पण नंतर तिच्या सासरच्यांकडून हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली. पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद अशा तिघांनाही अटक केली आहे. वैष्णवीच्या लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, फॉरच्युनर गाडी देण्यात आली होती. पण तरीही तिचा छळ का झाला, असा प्रश्न आता विचारला जातोय. त्यात आता वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. तसंच अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे हे आता फरार असल्यामुळं या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळाल्याचं पहायला मिळतंय. वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नक्की आहे काय, वैष्णवीच्या घरच्यांकडून तिच्या सासरच्यांवर नक्की काय आरोप केले गेलेत? राष्ट्रीय महिला आयोगाची या संपूर्ण प्रकरणात नक्की भूमिका काय, जाणून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment