Singers - Hrishikesh Nitin Dhavlikar
Lyrics - Unknown
Music Director - Rajshree Lele
Music Arranger - Vilas Joglekar
Chorus - Mayuri Kedase, Meera Agharkar
Video Editing - Amir Bhatade
Recording at Vidhi Voice Studio, Lower Parel (Shrikrishna Sawant)
Concept - Meera Agharkar
विज्ञानगीत
दिवस कालचा आज संपला
प्रभा उद्याची दिसली रे
विज्ञानाचे युग हे आले
चला स्वागता सामोरे 1 - कार्य सिद्धीला नवस कशाला? मांसाचा नैवेद्य कशाला?
देहाची जाळून पालवी
देहाची जाळून पालवी
जागरणे उपवास कशाला? अंधपणाची टाका पोथी
भविष्य आपुल्या हाती रे
विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे
2 - व्याधींचा चुकविण्यास हल्ला वास्तुशांती विण टिकण्या ईमला भूगोलाचे गमक जाणुनी
भूगोलाचे गमक जाणुनी अवकाशाच्या नवशोधाला
कुणी न उरला दुसरा आता
विज्ञाना विण वाली रे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे
3 - करा बुद्धीची आता ऐरण
आणि विवेके घालावे घण
कसोटीत या उजळून घ्यावा
कसोटीत या उजळून घ्यावा
जुना नवा तो विचार आपण
विज्ञानाच्या नव्या युगाची हीच असे ती नांदी रे
विज्ञानाचे युग हे आले
चला स्वागता सामोरे विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता सामोरे