भारतीय रागसंगीत हे शहरी लोकांसाठी आणि लोकसंगीत, लावणी वगैरे ग्रामीण लोकांसाठी !
ही समीकरणं आपल्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेली ! पण विदुर महाजन या ज्येष्ठ व प्रतिथयश कलाकाराने मात्र या सर्व समजुतींना छेद देत एक प्रयोग केला ! महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यातील सुमारे एक लाख ग्रामीण लोकांना सतारीच्या कार्यक्रमातुन आपलं भारतीय रागसंगीत ऐकवलं !! आहे की नाही भन्नाट प्रयोग ? गंमत म्हणजे, त्यानंतर जे घडलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही ! यासाठीच विदुर महाजनांची ही गोष्ट एकदातरी ऐकाच.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
सदर चित्रीकरण दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी रुक्मिणी सभागृह, MGM, औरंगाबाद येथे झालेल्या 'पगारिया ऑटो प्रस्तुत स्वयं' कार्यक्रमात झाले आहे.
या 'स्वयं टॉक' मधील व्हिडीओ क्लिपचे सौजन्य: दीपक थॉमस
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#marathiinspiration #passion #swayamtalks