Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
पांढरे - चुरमुरे, कांदा
पिवळे - शेव फरसाण, बटाटा
लाल - टोमॅटो
हिरवी - मिरची पुदिना कोथिंबीर,
आमसुली रंग - चिंच गुळाची चटणी
गुलाबी मीठ
चाट मसाला
सर्व एकत्र करून कालवलेली भेळ
नमस्कार मंडळी नवरात्री च्या निमित्ताने vmis खाद्ययात्रा साजरा करत आहे खाद्याचा रंगोत्सव. रंग म्हणजे निसर्गाची किमया आहे आणि आपल्या अवतीभावती या रंगाची उपस्थिती आपल्याला पावला पावला वर जाणवते आपण जे अन्न खातो त्यातही निसर्गाने रंग भरलेले आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने आपण एका दिवशी एक रंग असा पेहेराव करतो त्याप्रमाणे जाणीवपूर्वक निदान एक पदार्थ तरी या विशिष्ट रंगाचा असावं अशी कल्पना डोक्यात आली आणि हे पदार्थ गोडच असतील असं नाही फक्त कांदा लसूण विरहित आणि कृत्रिम रंग न वापरता केलेले असतील एवढ मात्र नक्की प्रत्येक रंगाचा एक विडियो vmis खाद्ययात्रावर येईल तो तुम्ही आवर्जून पाहावा ही विनंती
नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भजनाच्या निमित्ताने कांचनलक्ष्मी श्री सूक्त मंडळाच्या मैत्रिणींशी गप्पा मारण्याचा पुनः एकदा योग आला
https://youtu.be/vKxpId2wkRk - shree sukta part 1
या विडियो त खाद्य पदार्था शी निगडीत अशी मस्त धम्माल कोडी सोडवणार आहोत. हास्याचे फवारे उडवणार आहोत. विविध रंगांची उधळण असलेल्या रंगतदार भेळे चा आस्वाद घेणार आहोत त्यामुळे विडियो शेवटपर्यंत पहा आणि यांच्या सोबत तुम्ही सुद्धा कोडी सोडवा धम्माल करा तुमच्या चेहेऱ्यावर हास्याची एक लकेर जारी उमटली तर विडियो लाइक कर channel subscribe करून टाक
#colours
#navaratri
#navaratridhamaka
#navaratricelebrations
#entertainmentvideo
#joyful
#friendship
#natural
#festiveseason
#festivalspecial
#colourfulfood
#foodvideos
#quiz
Quiz
1) हिरव्या वेलीवरचा हा आहे नाग
बांधून खाल्ला तर शांत करतो आग - ?
2)गुलाल चा ‘ल’ ला ला लावला
अहाहा किती रस पाझरला - ?
3) पूर्ण असला तरी त्याला १/४ म्हणतात
हा असतो कायम त्याचे मित्र मात्र बदलतात ? (नांवे सांगा )
4) वळकटी असली तरी सोय नाही झोपायची
हिरवी पांढरी चादर अलगद घालायची -
चादर घातल्या घातल्या लगेच उचलायची
मोडायच्या आत फस्त करायची - ?
5) हिला कधी सोलता येत नाही
शिळी झाली तरी उत आणता येत नाही - ?
6) शरीरावर असतील तर सगळ्यांनाच आवडतात
रोजच्या जेवणातनं मात्र मला हद्दपार करतात - ?
7) त वरून ताकभात असतो लज्जतदार
सांगा पाहू भाताचे कोण कोण जोडीदार - ?
8) लाल रंगाचे ५ पदार्थ सांगा पटकन
शिजवायला वेळ नाही तसेच खायचेत आपण -
9) ५ पांढरे गोड पदार्थ सांगायचे
त्यातले मुख्य घटक repeat नाही करायचे -
10) मुळात पांढरे फटक पडलेले
पण हळदी ने त्यांचे सोने झाले - ?
11) याला पाहताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो
कारण हा सगळ्यांना आपल्याच रंगाने रंगवतो -
12) गुलाबी, निळा, राखाडी, जांभळा, मोरपीशी पैकी कोणतेही २ पदार्थ सांगा