MENU

Fun & Interesting

Walmik Karad ला १५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी, कराडला धमकी देणारा Shivraj Bangar नेमका आहे कोण ?

BolBhidu 253,423 1 day ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #WalmikKarad #ShivrajBangar वाल्मिक कराडला जीवे मारण्याची धमकी देऊन १५ लाख उकळले, हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही. सध्या राज्यात आपल्या गुन्हेगारीमुळं गाजत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नंबरचा आरोपी म्हणजे वाल्मिक कराड, परळीसह बीडमध्ये ज्याच्या दहशतीचे किस्से सांगितले जातात तो वाल्मिक कराड... त्याच वाल्मिक कराडला कोणी धमकी देईल, तीही थेट जीवे मारण्याची. बरं दिली, तरी घाबरून तो त्याला १५ लाख रुपये देईल, हे कोणालाही खरं वाटणार नाही. पण हे खरं आहे. याला आधार काय तर पोलिसांत दाखल झालेली तक्रार. गेल्या वर्षी २ जानेवारी २०२४ ला अशी फिर्याद दाखल आहे. त्यानुसार वर्षभर वाल्मिक कराडला ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याला घाबरून १५ लाख रुपये दिल्याचेही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आलंय. आता वाल्मीक कराडला धमकी देण्याची डेअरिंग केलीय ती शिवराज बांगर नावाच्या माणसानं. त्यामुळं अख्ख्या बीडमध्ये आपली दहशत निर्माण करणाऱ्या वाल्मिक कराडला धमकी देणारा हा शिवराज बांगर नेमका आहे कोण, पोलिस स्टेशनमधल्या फिर्यादीत नेमकं काय सांगण्यात आलंय, याबाबत बांगरचं म्हणणं काय, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment