#BolBhidu #WalmikKarad #BabanGitte
बबन गित्ते. कपाळावर टीळा, वाढलेले केस आणि लांब दाढी. वाल्मीक कराड. कपाळावर चंदन किंवा कुंकवाचा टीळा, हातात माळा. पाय मात्र अनवाणी. गीत्तेचे केस कापलेले दिसत नाहीत आणि वाल्मिक कराडच्या पायात कधी चप्पल दिसत नाही. का ? असा प्रश्न विचारला की बीडमधले स्थानिक पत्रकार आणि नागरिक सांगतात. या दोघांनी शपथ घेतली आहे. एकमेकांच्या विरुद्ध, एकमेकांना संपवण्याची. बबन गित्तेनं जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवत नाही, तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही, अशी शपथ घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडं जो पर्यंत बबन गित्तेला संपवणार नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मीक कराडनं घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, दोघांवरही दोन युवा सरपंचांची हत्या केल्याचा आरोप होत आहे. पण एकेकाळी मुंडे कुटुंबासाठी एकनिष्ठेनं काम करणाऱ्या बबन गित्ते आणि सध्या मुंडे कुटुंबासाठी एकनिष्ठेनं काम करणाऱ्या वाल्मीक कराड यांच्यात वाद का झाला, त्यांच्या शपथांबाबत नेमकी काय चर्चा आहे, त्याचीच ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/