#BolBhidu #SantoshDeshmukh #WalmikKarad
संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल झाली आणि आरोपींभोवतीचा फास आवळला गेला. या चार्जशीटमध्ये हत्येचा घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. तसच आठही आरोपींवरील गुन्हा स्पष्ट करण्यासाठी १८४ लोकांच्या साक्षी आणि ६६ ठोस पुरावे असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. तर वाल्मीक कराडच खुनाचा मास्टरमाइंड कसा ठरतोय, हे सुद्धा चार्जशीटमधून स्पष्ट झालंय. या चार्जशीटमध्ये सीआयडीकडून आरोपींचे देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, फोटो आणि खंडणीसाठी केलेल्या फोनचं ऑडिओ रेकॉर्डिंगही जोडलं आहे.
सोमवारी ३ मार्चच्या रात्री चार्जशीटमधल्या या गोष्टी माध्यमांमध्ये आल्या आणि आरोपींची क्रूरता बघून अनेकांचा थरकाप उडाला. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरचा दबाव वाढला आणि मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण चार्जशीटमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी काढण्यात आलेल्या फोटोंसोबत आणखी कुठल्या गोष्टी आहेत ? व्हाट्सअप व्हिडीओ कॉलबाबत काय माहिती समोर आली आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.co