MENU

Fun & Interesting

womensday kashish foundation महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक जनजागृती विषयावर फॅशन शो चे आयोजन

Video Not Working? Fix It Now

अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. पाच - सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला - पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा - वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स घेणार आहे. रांका मिस / मिसेस / मिस्टर ग्लोबल इंडिया या फॅशन शो मधून महिला आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांच्यासह रांका ज्वेलर्स चे शिवम अरोरा, काशिश प्रॉडक्शन्स च्या ब्रँड ॲम्बेसेडर स्नेहल नार्वेकर,केतकी शिरबावीकर,निलाक्षी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. फॅशन शो विषयी माहिती देताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रॉडक्शन्स च्या वत्तीने यंदाच्या महिला दिना निमित्त हा फॅशन शो आयोजित केला आहे. यामध्ये महिलां मध्ये स्वच्छता, मासिक पाळी आदीं बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हा फॅशन शो ३ मार्च रोजी एलप्रो मॉल चिंचवड येथे पार पडणार आहे. या सामाजिक उपक्रमांबद्दल शिवम अरोरा म्हणाले,महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी योगेश पवार यांनी या फॅशन शो ची संकल्पना मांडली ती तेजपाल रांका यांना अतिशय महत्वाची वाटली, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आम्ही या फॅशन शो चा भाग होत आहोत.या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला रांका ज्वेलर्स तर्फे फोटोशूट तसेच चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.

Comment