#BolBhidu #JyotiMalhotra #DanishRahim
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. सीमेवर सीझफायर झालं असलं, तरी हा तणाव अजूनही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी १७ मे ला एक बातमी आली. एका युट्यूबरच्या अटकेची. हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. अटकेचं कारण काय ? तर ज्योतीनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केली असा आरोप. भारतातली संवेदनशील माहिती पाकिस्तानात शेअर केल्याच्या आरोपांखाली ज्योतीला अटक करण्यात आलीये. या प्रकरणात ज्योतीसोबतच आणखी ६ जणांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेले हे सगळे लोक पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या नियमित संपर्कात होते आणि शत्रूला माहिती पुरवत होते. चार दिवसांपूर्वीच भारत सरकारनं हेरगिरीच्या आरोपाखाली नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी हाय कमिशनच्या एका अधिकाऱ्याला देशाबाहेर हाकलून दिलं होतं. आता याच व्यक्तीशी संपर्क असलेल्या भारतीय नागरिकांना हेरगिरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलीये. यामुळे हे हेरगिरीचं मोठं रॅकेट असल्याची शक्यता आता पुढे आली आहे. अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा नेमकी आहे कोण? ती पाकिस्तानला माहिती कशी पुरवत होती? यामध्ये तिला मदत करण्याचा पाकिस्तानचा गुप्तहेर कोण होता? या प्रकरणात कोणकोणाला अटक करण्यात आली? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/