*श्री क्षेत्र येडेश्वर देवस्थान नेहरकरवाडी येडगाव देवस्थानाच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त रंगला कलगीतुऱ्याचा जंगी सामना*
नेहरकरवाडी कुकडी कॉलनी येडगाव येथे येडेश्वर देवस्थानाचा पंधरावा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी सकाळपासूनच याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी आठ ते नऊ या वेळेत मांडवडहाळे व सत्यनारायण महापूजा , दहा ते सायंकाळी सहा या वेळेत शाहीर दिपाली सोमनाथ गायकवाड व शाहीर स्वप्निल मच्छिंद्र गायकवाड याचा कलगीतूऱ्याचा सामना , सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत महाप्रसाद व भजनसंध्या आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी शाहिरांनी आपल्या शाहिरी ढंगातून उपस्थितांना प्रबोधन केले.
यावेळी कार्यक्रमासाठी कुकडी पाटबंधारे विभागाचे उपाभियंता सावंत रावसाहेब , टेंभेकर रावसाहेब , वाळुंज रावसाहेब , रामदास मोरे , गुलाबशेठ नेहरकर , पोपट नेहरकर , संतोष नेहरकर , हनुमानशेठ भोर , अशोक नेहरकर , माऊली हांडे , अशोक फुलसुंदर , दादाभाऊ मिंडे आदी मान्यवरांसह परिसरातील भाविक व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
निलेश शिंदे
ब्युरो रिपोर्ट
विघ्नहर टाईम्स
कुकडी कॉलिनी
नेहरकरवाडी येडगाव