तमाशा शाहीर राजा पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य तमाशात घालवलं. २०१० सालानंतर पूर्णपणे अध्यात्माकडे झुकणारी त्यांची वाटचाल धक्क करणारी आहे.त्याचे कारण एका पुरोगामी चळवळीतील नागनाथअण्णा नायकवडी यांनी त्यांना संत तुकारामांच्यावर पोवाडा सादर करण्यास सांगितले. तेंव्हापासून त्यांच्या आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली आणि ते माळकरी झाले. मग तुकोबांचा विचार पोवाड्यातून रसिकापर्यंत पोहचवू लागले. एक तमाशा कलावंत तमाशाकडून आध्यात्माकडे जातो हे मोठे यश त्या व्यक्तीच्या आयुष्यात आहे असे म्हणावयास हरकत नाही.
डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली
9623241923