२०२५ मध्ये आपल्या वसंत व्याख्यानमालेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला आहे,या दोन्हीचे अवचित्य साधून आपण जागर मराठीचा २०२४ ही विशेष व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
सन १९२५ पासून आरंभित झालेली मिरज विद्यार्थी संघाची वसंत व्याख्यानमाला ही महाराष्ट्रात दीर्घकाल सातत्याने होत असलेल्या काही थोड्या वसंत व्याख्यानमालांपैकी एक आहे.
ह्या व्याख्यानमालेत अनेक नामवंत विचारवंत, साहित्यिक, उद्योजक, कलावंत, क्रीडापटू, विज्ञानवेत्ते, वैद्यकशास्त्रनिपुण आदींनी व्याख्यानपुष्पे गुंफली आहेत. श्रोत्यांचा भरपूर व जाणता प्रतिसाद याबद्दल वक्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्व क्षेत्रातील सुमारे १२०० वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत.
सन १९८२ पासून वसंत व्याख्यानमालेत झालेली अनेक व्याख्याने ध्वनिमुद्रण स्वरूपात संस्थेकडे उपलब्ध आहेत. लवकरच व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष २०२५ साली वर्षभराच्या उपक्रमाने साजरे करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने संस्थेकडे मुद्रित स्वरूपात असलेला हा ठेवा महाराष्ट्रासच नव्हे तर जगभरातील मराठी भाषिक भारतीयांना युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत
ही व्याख्यानमाला सर्वस्वीपणे लोकवर्गणीतून चालविली जाते.
#knowledge#agriculture#farming #history#law#supremecourt#judge#highcourt #maharashtra #india #education #cultural #social #maratha #kharemandir #vasntvyakhyanmala #socialawareness #people #freetalk #openplatform #lokmanyatilak #sawarkar #narharkurundkar #gandhi #shivajimaharaj #khareshastri #intellectuals #thinker #thoughts #ngo #marathi#police##marathi