ढाब्यासारखे चवीचे पालक पनीर / पाणी पालक वेगळे होते? या सहज टिप्स वापरुन बनवा हॉटेल सारखे पालक पनीर
Palak Paneer Serves 4
preparation time 15 minutes
cooking time 25 minutes
साहित्य
पालक पनीर :-
पहिल्यांदा पालकाची पाने उकलत्या पाण्यातून 2-3 मिनिटे उकळून घ्या .. बाहेर काढून निथळून लगेच बर्फाच्या थंड पाण्यात घालून ठेवा .. थंड झाल्यावर मिक्सर् मध्ये पालक , हिरवी मिरची , कोथिंबीर आणि आले घालून थंड पानी घालून बारीक करून घ्या .
नंतर थोडे पानी उकळून घ्या पानी उकळले की त्यामध्ये काजू घालून थोडे वेळ शिजवून घ्या . थंड झाल्यावर कंजूची पेस्ट बनवून घ्या
एका पॅन मध्ये तूप घेऊन त्यावर पनीर shallow fry करून घ्या आणि फ्राय झाल्यावर थंड पाण्यात टाकून ठेवा
आता पॅन मध्ये तूप घेऊन त्यामध्ये जिरे , तमालपत्र , सुक्या मिरची घालून परतून घ्या .. नंतर लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या . बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या , कांदा थोडा तांबूस रंगावर परतून घ्या , त्यानंतट हळद , मिरची पाऊडर आणि जिरे पूड घालून पानी घालून मिसळून , झाकून मंद आचेवर वाफ काढू .
मिनिटे वाफ काढल्यावर काजू पेस्ट आणि थोडे पानी घालून मिसळून घ्या. तानंतर दही घालून मिसळून घ्या .. नंतर पालक पेस्ट घालून चांगले मिक्स करून घ्या आणि गरजेप्रमाणे गरम पानी घाला . मिक्स करून घ्या .
त्यानंतर बेसन घालून मिसळून घ्या .. मंद आचेवर झाकून 5 मिनिटे शिजवून घ्या .
नंतर कसूरी मेथी , आणि पनीर घाला आणि मिसळून घ्या .
शेवटी फ्रेश क्रीम आणि गरम मसाला पावडर घालून 2 मिनिटे शिजवून घ्या .
#पालकपनीर #ढाब्यासारखेपालकपनीर #पालकपनीरटिप्ससहीत #पालकपनीररेसिपीमराठी #पालक #पनीर #हॉटेलसारखेपालकपनीर #पनिरपालक #palakpaneer #पालकपनीररेसिपी #palakpaneer #saritaskitchen